गणपती बाप्पा मोरया ! तुळजाभवानी मंदिरामध्ये राजे शहाजी महाद्वार मधून प्रवेश केल्यानंतर आपण कल्लोळ तीर्थमध्ये पवित्र होऊन, गोमुख तीर्थ मध्ये जातो व पुढे आल्यानंतर निंबाळकर द्वाराच्या डाव्या बाजूस हे मंदिर स्थित आहे.
प्रथम दर्शन गणरायाचे म्हणजेच उजव्या सोंडेचा गणपती तसेच सिद्धिविनायकाचे दर्शन होते.
गणपती बाप्पा हि एक प्रेरणा देणारी देवता असून बुद्धीची देवता म्हणून हि संबोधले जाते. अनेकवेळा आपण डाव्या सोंडेचा गणपती पहिला असेल पण एकमेव सिद्धिविनायकाची मूर्ती हि उजव्या सोंडेची असून त्याचे महत्व देखील तेवढेच आहे. याचे महत्व समजून घेऊया…

गणपतीची सोंड उजव्या हाताच्या वारील बाजूने वळली असेल तर तो सिद्धिविनायक म्हणून संबोधलं जातो व डाव्या हाताच्या वरील बाजूस वळली असेल तर त्यास ऋद्धिविनायक संबोधले जाते. जर सोंडेचे टोक उजव्या हाताच्या खालील असल्यास तो बुद्धिविनायक असतो आणि जर डाव्या हाताकडील खालच्या बाजूस असल्यास तो शक्तीविनायक असतो. तसेच गणेश आणि महागणपती या दोन वेगवेगळ्या संकल्पना आहेत. माता पार्वती देवीने तयार केलेला शाडू चा गणेश हा महागणपती अवतार असून तिने मूर्तीला आकार देऊन त्यात महागणपतीचे आवाहन केले. दृष्टांचा नायनाट आणि संकटाचे हरण म्हणजेच आलेले संकट परतवून लावण्यासाठी विविध प्रसंगी महागणपतीने अवतार घेतलेला आहे.
हि उजव्या सोंडेची गणेशाची मूर्ती ३.५ फूट उंच असून स्वयंभू मूर्ती आहे तसेच या मूर्तीचे मुख पूर्वीकडे आहे.