छत्रपती शिवाजी महाराजांचे आराध्य दैवत आणि साडेतीन शक्तिपीठांपैकी पहिले पूर्ण शक्तिपीठ महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजा भवानी आणि तिचे वास्तव्य असलेले श्रीक्षेत्र तुळजापूर.[ Tulja bhavani Temple Tuljapur ]
आज आपण या तुळजापूर आणि तुळजाभवानी मंदिराची Tulja Bhavani Temple Tuljapur माहिती घेणार आहोत.तुळजापूर हे धाराशिव जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण आहे. पूर्वी येथे चिंचचे झाडे जास्त असल्यामुळे याला चिंचपूर असे नाव होते. तर तुळजापूर नावाची हि कथा काहीशी रोमांचकच आहे. कृतयोगात कुरधरुषींच्या पत्नी अनुभूतीची आई साठी तुळजाभवानी भवानी त्वरित धावून अली म्हणून तिला त्वरिता म्हणू जाऊ लागले. त्वरिता चे आणि तुर्जा चे अपभ्रंश होऊन पुढे तुळजा झालं, आणि पुढे तुळजा भवानी असे नाव प्रचलित झाले. तुळजापूर हे नाव आजपर्यंत टिकून आहे.
या ठिकाणी येण्यासाठी महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधून महामंडळ बससेवा उपलब्ध आहे. बसने आल्यानंतर भाविकांचा पायी प्रवास सुरू होतो.
रस्त्यावर दोन्ही बाजूंना असंख्य दुकाने आहेत. आईसाठी प्रिय असलेली कवड्यांची माळ आणि विविध वस्तू येथे सहज मिळतात. काहीच अंतराने आपल्याला भवानी तीर्थ दिसते. भवानी तीर्थ येथे स्नानासाठी भाविकांची गर्दी दिसते. महिलांसाठी आणि पुरुषांसाठी वेगवेगळे कुंड आहेत. भाविक स्नानाचा मनसोक्त आनंद घेतात. स्नानानंतर आपण मंदिराच्या दिशेने जातो. गणपतीचे दर्शन घेऊन पुढे राजेशहाजी महाद्वार ओलांडून आपण तुळजाभवानी मंदिरात प्रवेश करतो.
Tuljapur Darshan | तुळजापूर दर्शन प्रणाली
तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी चार प्रकारच्या रांगा आहेत:
तुळजाभवानी मातेच्या पूजा आणि दर्शनासाठी पाच प्रकारच्या रांगा आहेत:
- धर्म दर्शन
- मुख दर्शन
- ₹२०० पेड दर्शन
- ₹५०० VIP दर्शन
- अभिषेक पूजा (सर्वात उत्कृष्ट)
धर्म दर्शन | Dharma Darshan
धर्म दर्शन जिथे तुळजाभवानी चे दर्शन १० ते १२ फूट अंतरावरून होते आणि हे दर्शन निःशुल्क आहे तर या दर्शनासाठी ३ ते ४ तास लागू शकतात.
मुख दर्शन | Mukha Darshan
मुख दर्शन या दर्शन रांगेमध्ये देवीचे दर्शन हे ५० फूट अंतरावरून होते. तर या दर्शनाला १ ते २ तास लागू शकतो.
पेड दर्शन | Paid Darshan
पेड दर्शन या दर्शन प्रणालीमध्ये प्रति व्यक्ती ₹२०० रुपयांना मिळणारा पास उपलब्ध आहे. या रांगेमध्ये दर्शनासाठी किमान १ तास, कमाल ३ तसंच वेळ लागू शकतो. हे दर्शन १० फूट लांबून होते.
स्पेशल दर्शन | VIP Darshan
₹५०० रुपयांना मिळणारा VIP दर्शन पास यामध्ये भक्तांचे दर्शन १० फूट लांबून होते. आणि यासाठी ३० मी. ते १ तासांचा कालावधी लागू शकतो.
अभिषेक पूजा | Abhishek Pooja
सर्वात सोईस्कर आणि गर्भगृहामध्ये दर्शन घेण्यासाठी आपल्याला अभिषेक पूजेमध्ये गर्भगृहामध्ये जाण्यासाठी मिळते. एक अभिषेक पूजेसोबत जास्तीत जास्त ५ व्यक्तींना प्रवेश आहे. अभिषेक पूजेसाठी आपल्याला कमीत कमी ७ दिवस अगोदर आपले नाव नोंदवणे गरजेचे आहे. अभिषेक पूजा ह्या सीमित असल्यामुळे या गर्भगृह दर्शन आणि पूजा प्रणालीमध्ये आपल्याला १ ते १.३० तासांचा कालावधी लागू शकतो. अभिषेक पूजेची वेळ सकाळी ६ ते ९ आणि सायंकाळी ७ ते ९ अशी आहे.
पवित्र तीर्थे | Sacred Tirth
महाद्वारापासून काही पायऱ्या उतरल्यानंतर कल्लोळ तीर्थ आहे, जिथे अखंड जलधारा वाहत असतात. पौराणिक कथा सांगते की पृथ्वीवरील सर्व तीर्थे इथे एकवटल्याने त्याला “कल्लोळ तीर्थ” असे म्हणतात.

कल्लोळ तीर्थापासून काही पायऱ्या उतरून आल्यावर उजव्या बाजूला गोमुख तीर्थ आहे. या तीर्थ मध्ये अखंड जलधारा वाहत असतात.

गोमुख तीर्थापासून थोडे पुढे गेल्यास सरदार निंबाळकर दरवाज्याच्या डाव्या बाजूस उजव्या सोंडेचा गणपती आहे. तसेच या सिद्धिविनायकाला नवस पूर्ती करणारा असे देखील ओळखले जाते. तर Tulja Bhavani Temple Tuljapur या निंबाळकर प्रवेश द्वाराच्या उजव्या बाजूस अनेक देवता आहेत. यामध्ये विठ्ठल रुक्माई, गणपती, मारुती, श्री दत्त यंत्र, नारदमुनी यांचे दर्शन होत.
💡 Do you know how to get - Tuljapur Darshan Pass
Tulja bhavani Temple Tuljapur | तुळजाभवानी मंदिर तुळजापूर
निंबालकर प्रवेशद्वारातुन काहीश्या पायऱ्या उतरल्यानंतर समोरच होमकुंड दिसते. यामध्ये नवरात्री मध्ये आजाबली दिला जातो. तसेच यज्ञकुंडाजवळ होम विधी होतो व
यज्ञकुंडातील अंगारा किंवा भस्म भाविकांना दिला जातो. होमाच्या पाठीमागे जावळ काढण्याचे ठिकाण आहे.
मंदिराच्या पाठीमागे चिंतामणी आहे जिथे राजे छत्रपती शिवाजी महाराज युद्धाला जाताना कौल लावायचे. ते आज पर्यंत भावीक मनातील इच्छांचा व मनोकामना पूर्ण होईल कि नाही याचा कौल लावतात, जर चिंतामणी उजवीकडे फिरली तर आपण जी मनामध्ये इच्छा बोलली आहे ती पूर्ण होईल आणि डावीकडे फिरली तर नकार असतो. जर स्थिर राहिली तर आपण जी मनामध्ये इच्छा किंवा काम बोलले आहे ते कामास वेळ लागू शकतो. तसेच राजे छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वाराजवळ श्री दत्त गुरुंचे मंदिर आहे.
आई तुलजा भवानी चांदीच्या सिंहासनावर विराजमान आहे. तिच्या हातात विविध शस्त्रे आहेत – चक्र, बाण, खड्ग, त्रिशूल, धनुष्य, शंख, आणि पात्र. तिच्या पायाशी सिंह आणि मारकंडेय ऋषींची मूर्ती आहे.
दर्शन आणि पूजा करण्यासाठी घेऊन आपल्या पुजाऱ्यासोबत कुलधर्म कुलाचार पूजा करण्याची सोया येथे आहे. तसेच मंदिर परिसरात गोंधळ व पूजेची सोय केली जाते. देवीला नवे वस्त्र म्हणजेच साडी चोळी, मान सन्मान देऊन तुळजाभवानी देवीची पूजा करता येते.
तुळजाभवानी मंदिराला प्रदक्षिणा घेऊन भाविक मंदिराच्या बाहेर येतात. प्रवेशद्वाराजवळ विसावा घेऊन, मंदिराच्या शांत व चैतन्यमय वातावरणाचा अनुभव घेतात.