लाखो भक्तांची कुलस्वामिनी तुळजापूर वासिनी श्री तुळजाभवानी तसेच छत्रपती शिवाजी महाराजांची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी. दूर दूर हुन येणारे भक्त आपल्या मनामधील इच्छा बोलण्यासाठी येतात. भक्त आपल्या पवित्र मनाने इच्छा देवीसमोर मागतात आणि त्यांच्या मनातील इच्छा देखील पूर्ण होते. तुळजा भवानी ला आपण केलेली श्रद्धेने मनोभावाने मागितलेली इच्छा चिंतामणी वर सुद्धा मागितली जाते. [ Tuljabhavani Stone Chintamani ]
चिंतामणी हा एक दैविक शक्ती असलेला दगड असून त्यावर हात ठेऊन लाखो भाविक आपली मनोकामना, इच्छा मागतात. असे आहे कि, छत्रपती शिवाजी महाराज युद्धापूर्वी मनामध्ये शंका आल्यास ते सतत तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी येत होते. चिंतामणी वर हात ठेऊन युद्ध जिंकेल कि नाही अशी इच्छा बोलत तेव्हा त्यांना प्रत्येक वेळी चिंतामणीने होकार दिला आहे.

[ Tuljabhavani Stone Chintamani ]
अशी काम करते चिंतामणी
- सर्वप्रथम आपण चिंतामणी ला नमस्कार करून घ्यावा.
- दोन्ही हात चिंतामणीवर ठेऊन आपल्या मनामध्ये आपले काम, इच्छा, मनोकामना बोलावी.
- जर चिंतामणी उजव्या बाजून फिरल्यास आपल्या मनातील इच्छा पूर्ण होते जर चिंतामणी डाव्या बाजूस फिरल्यास त्यास नकार असतो आणि ती स्थिर राहिल्यास अनिश्चितता दर्शविते.
अशा प्रकारे आपण चिंतामणीवर कौल लावू शकतो.