Tuljabhavani Temple Yajna Mandap | तुळजाभवानी मंदिरातील यज्ञ मंडप
यज्ञ म्हणजे “भक्ती, पूजा, बलिदान आणि नैवेद्य” श्री तुळजाभवानी मंदिर तुळजापूर मध्ये येत असताना आपण महाद्वारामधून प्रवेश करून काहीश्या पायऱ्या उतरून आल्यानंतर आपल्याला कल्लोळ तीर्थ दिसते तिथे पवित्र होऊन मंदिराच्या दिशेने आल्यानंतर पिंपळाच्या झाडाखाली यज्ञ मंडप आहे. यज्ञ मंडपाचे शिखर सोन्याचे असून शिखरावर पहिले असता १२ तुळजाभवानी देवीचे रूपे आपल्याला पाहावयास मिळतात.
